नाशिक दुर्घटना – चौकशी समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य शासनाने सातसदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीने पंधरा दिवसांत शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल रोजी ऑक्सिजन टाकीच्या गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली, यात 24 रुग्णांचा मृत्यू झाला, त्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. यात आरोग्य उपसंचालक डॉ. पुना गांडाळ, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद गुंजाळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानेश्वर नाठे, नाशिक महापालिकेचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार आणि तज्ञ हर्षल पाटील हे सदस्य आहेत.