
येवला तालुक्यातील खरवंडी येथे मंगळवारी संध्याकाळी बंधाऱ्यात बुडून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेंडाळे येथील अरुण चंद्रभान आहेर यांचा मुलगा रोशन (13) हा मंगळवारी दोन मित्रांसह खरवंडी येथील बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. तो अचानक पाय घसरून पाण्यात पडून बुडाला. मित्रांनी आरडाओरड करताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले. उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले, अशी माहिती येवला तालुका पोलिसांनी दिली.


























































