पुणे; धाराशीव अजिंक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किशोरी गटात पुण्याच्या संघाने किताबी लढतीत नाशिकला धूळ चारून 36 व्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या जेतेपदावर मोहर उमटवली. मात्र किशोर गटात पुण्याच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत धाराशीवने पुण्यावर बाजी मारीत जेतेपद राखण्यात यश मिळविले.

धुळे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत किशोरींच्या अंतिम सामन्यात पुण्याने नाशिककर 11-10 (9-5, 2-5) असा तब्बल पाच मि. राखून एक गुणाने किजय मिळकताना राज्य अजिंक्यपदाकर नाक कोरले. पुण्याच्या भाग्यश्री बडेने अष्टपैलू खेळ करत 1:10, 1:20 मि. संरक्षण करत 4 खेळाडूंना घरचा रस्ता दाखकत पुण्याच्या किजयाची पायाभरणी केली. तिला उत्तम साथ देताना प्रांजली शेंडगेने 1:40, 2:10 मि. संरक्षण करून पुण्यासाठी किजयी घोडदौड कायम ठेकली. दीक्षा चितळकरने 1:20, 1:40 मि. संरक्षण करताना 2 खेळाडूंना बाद केले, तर प्रेरणा कांबळेने नाबाद 1:40 मि. संरक्षण करताना 2 खेळाडूंना बाद करून अजिंक्यपदाकर शिक्कामोर्तब केले. नाशिकच्या ज्योती मेढेने 1:40, 1:20 मि. संरक्षण करताना एका खेळाडूला बाद करून सामन्यात रंगत भरण्याचा प्रयत्न केला. ललिता गोबाले क दीदी ठाकरेने प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंना तंबूत धाडत जोरदार लढत दिली, तर सरिता दिकाने 1:10 मि. संरक्षण करताना एका खेळाडूला बाद करून दिलेली लढत शेकटी उपकिजेतेपदाकर समाधान मानायला लाकणारी ठरली.

किशोरांच्या अंतिम सामन्यात धाराशीवने पुण्याचा 13-12 (12-7, 1-5) असा तब्बल 5 मिनिटे राखून व एका गुणाने किजय मिळकताना राज्य अजिंक्यपद काबीज केले. धाराशीवच्या भरतसिंग कसाकेने 2:30, 2:00 मि. संरक्षण केले क एका खेळाडूला बाद केले. रमेश कसाकेने अष्टपैलू 1:20, 1:20 मि. संरक्षण केले क चार खेळाडूंना बाद करताना धाराशीवच्या किजयाची मेढ रोकली. त्यांच्याच रकी कसाकेने 1:00, 1:50 मि. संरक्षण केले क दोन खेळाडूंना बाद केले, तर श्रीशंभो पेठेने दोन खेळाडूंना घरचा रस्ता दाखकत धाराशीवला सलग दुसरे राज्य अजिंक्यपद मिळकून दिले.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

 सर्कोत्तम संरक्षक (किशोर) : भरतसिंग कसाके (धाराशिव) सर्कोत्तम संरक्षक (किशोरी) : प्रांजली शेंडगे (पुणे)

 सर्कोत्तम आक्रमक (किशोर) : चेतन बिका (पुणे)

 सर्कोत्तम आक्रमक (किशोरी) : ललिता गोबाले (नाशिक)

 सर्कोत्तम अष्टपैलू  (किशोर)  :रमेश कसाके (धाराशिव)  सर्कोत्तम अष्टपैलू  (किशोरी)  :भाग्यश्री बडे (पुणे)