कांदा उत्पादकांसमोर पुन्हा शेतीकर्ज काढण्याचे संकट

1090

अतिवृष्टीमुळे कांद्याची नासाडी झाली. अपेक्षित कांदा उत्पादन झाले नाही. जो कांदा हाती आला तो विकून जे पैसे हाती आले त्यातून बियाणे, मजुरी, औषधे, खत आदींवर खर्च झाले. जेवढे पैसे गुंतवले तेवढेच उत्पादन मिळाले. त्यामुळे कांदा उत्पादकांसमोर पुन्हा शेतीकर्ज काढण्याचे संकट उभे ठाकले आहे.

लासलगाव बाजार समितीत गुरुवारी 5हजार 258 क्विंटल नव्या कांद्याची आवव झाली. त्याला कमाल 10हजार 12 तर किमान दोन हजार, सरासरी 7 हजार 1 रुपये दर मिळाले. बाजार समितीत जेमतेम चारशे शेतकऱयांनी कांदा आणला होता. त्यापैकी कोणाचा चार-पाच क्विंटल, तर कोणाचा 10 ते 12 क्विंटल माल होता. बाजारात सर्वाधिक म्हणजे 22 क्विंटलपर्यंत कांदा घेऊन येणारा एखाद्-दुसराच शेतकरी होता. अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीकर आलेल्या नव्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. ज्या एक एकरमध्ये 60 ते 70 क्विंटल कांदा निघतो, तिथे जेमतेम चार ते पाच क्विंटलचे उत्पादन झाले, असे अनेक शेतकऱयांचे म्हणणे आहे.

इतर वेळी या काळात बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक भरपूर असते. लासलगाव बाजारात दररोज हजार ते बाराशे शेतकरी 20 ते 25 हजार क्विंटल माल आणतात. इतर बाजार समित्यांमध्ये वेगळी स्थिती नसते. आज हे प्रमाण तीन ते चार हजार क्विंटलपर्यंत खाली घसरले आहे. डिसेंबरअखेपर्यंत उशिराच्या खरीपाची आवक सुरू होईल. ती आवक काढल्यानंतर कांद्याचा तुटवडा काही अंशी कमी होईल. इतिहासात उच्चांकी दर गाठल्याने कांद्याची देशपातळीवर चर्चा होत आहे. दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारही बैठका घेत आहे. परंतु त्या उच्चांकी दरातून ना नफा, ना तोटय़ाचे समीकरण शेतकरी मांडत आहेत.

शेतकरी संख्या वाढली तरी कांदा आवक कमीच गेल्या काही दिवसांत नकीन कांदा घेऊन येणाऱयांची संख्या हळूहळू काढत आहे. पंधरवडय़ापूर्वी केवळ 70 ते 80 शेतकरी कांदा घेऊन यायचे. आता ती संख्या 300 ते 400 पर्यंत पोहचली आहे. माल घेऊन येणारे शेतकरी काढत असले तरी मालाचे प्रमाण चार क्विंटल ते अधिकतम 20 क्विंटलपुरतेच मर्यादित आहे.

‘मी बाजार समितीत 19 क्विंटल कांदा किवला. त्यातून मला एक लाख 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. लवकरच आणखी 10 ते 12 क्विंटल आकाराने लहान कांदे काढणीकर येतीलही. मात्र चार एकरमध्ये मी कांदा लागवड केली होती. कर्ज काढून भांडवल गुंतवले; परंतु या कांदा विक्रीतून केवळ माझे कर्ज फिटले जाईल. पुन्हा पीक कर्ज घेऊन लागवड करावी लागेल.’ – नंदू बदे, शेतकरी अनकाई.

एक एकरात कांदा लागवड करताना बियाणे, मजुरी, औषधे, खत आदींवर 30 हजार रुपये खर्च झाले. अतिवृष्टीमुळे उत्पादन झाले केवळ चार क्विंटलचे. तो किवून 30 हजार रुपये मिळाले. म्हणजे जेवढी गुंतवणूक केली तेवढेच पैसे मिळाले.’

आपली प्रतिक्रिया द्या