
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीच्या वतीने मंगळवारी युद्ध सराव अभ्यास प्रात्याक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. मंगळवारी या कॅम्पमध्ये तोफेचा युद्धअभ्यास घेण्यात आला. भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाच्या विविध तोफांनी आज नाशिकच्या कॅम्पमध्ये शक्तीचे प्रदर्शन घडवले. या कार्यक्रमाचे नेतृत्व स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमाडंट व रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वरिष्ठ कर्नल कमाडंट लेफ्टनंट नवनित सिंग सरना यांनी केले. त्यावेळी टीपलेली ही काही छायाचित्रे.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)



































































