शिर्डी विमानतळावरील विमानसेवा दोन दिवसांपासून बंद

572

खराब हवामानामुळे दोन दिवसांपासून शिर्डी विमानतळावरील विमानसेवा बंद असल्याने साईभक्तांचे मोठे हाल होत आहेत.

शिर्डी विमानतळावर रोज 14 विमानांची ये-जा असते. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान व काही प्रमाणात धुके असल्याने 28 विमानांचे लँडिंग व टेकऑफ रद्द करण्यात आल्याची माहिती विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शास्री यांनी दिली. शुक्रवारीही ही सेवा बंद असल्याने भाविकांचे मोठे हाल झाले. सध्या शिर्डी विमानतळावर मुंबई, इंदूर, भोपाळ, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, जयपूर आदी शहरांतून विमानवाहतूक सुरू असते. गुरुवारी सकाळपासून खराब हवामानामुळे व दृष्यमानता नसल्याने विमानांना उतरण्यासाठी संकेत मिळत नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या