महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक महापालिकेच्या आनंदवलीतील शाळेचे 25 विद्यार्थी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या पुढाकाराने हवाई प्रवास करीत मुंबईत सहलीसाठी गेले आहेत. त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधता आल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 18 मधील 25 विद्यार्थी सोमवारी विमानाने पुण्याला पोहचले, तेथून खासगी बसने ते मुंबईत दाखल झाले. मंगळवारी मुंबई दर्शन केल्यानंतर बुधवारकी त्यांनी विधानसभा व विधान परिषदेतील कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, चांगले शिक्षण घेवून मोठे अधिकारी व्हा, अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधता आल्याने मुलांनी आनंद व्यक्त केला.

त्यानंतर या मुलांनी अर्थ मंत्री जयंत पाटील, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांचीही भेट घेतली. यावेळी सातपूर प्रभाग सभापती, नगरसेवक संतोष गायकवाड, मुख्याध्यापक कैलास ठाकरे, शिक्षक अमित शिंदे, कुंदा शिंदे, वैशाली भामरे हजर होते.