
अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेली द्राक्षबाग वाचविण्यासाठी न परवडणारा भरमसाट खर्च यामुळे उद्विग्न झालेले अंजनेरी येथील शेतकरी गोरख चव्हाण यांनी आपली चार एकर निर्यातक्षम द्राक्षबाग तोडून भुईसपाट केली आहे.
गोरख चव्हाण यांची बारा एकर द्राक्षबाग आहे. दोन-तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने बाग वाचविण्यासाठी भरमसाट खर्च होतोय, उत्पन्न मात्र तितके मिळत नाही. यावेळच्या अवकाळी पावसाने बाग पूर्ण कुजली, पानगळ झाली, उद्ध्वस्त झाली. ती पुन्हा उभी करण्याचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने चव्हाण उद्विग्न झाले.
























































