
सामना प्रतिनिधी। नाशिक
नाशिक जिह्यात सिन्नर, देवळा, सटाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी तालुक्यात मंगळवारी सलग तिसऱया दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे वीज पडून वृद्ध पुजाऱ्याचा मृत्यू झाला.
सिन्नर तालुक्यातील देवपूर, वावी, नांदूरशिंगोटे, शहा, भोकणी, सोमठाणे, देवपूर येथे सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावली. मंगळवारीही याच परिसरात दुपारी तासभर पाऊस झाला. देवळा तालुक्यात सोमवारी रात्री लोहणेर, दहीवड, भावडे, उमराणे येथे पाऊस झाला. येथे 14 कच्च्या घरांची पडझड झाली आहे. आज दुपारी येथे अर्धातास रिमझिम पाऊस झाला.
सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे सोमवारी रात्री व जायखेडा येथे आज दुपारी वादळासह पाऊस झाला. करंजाड येथे वादळी वाऱयामुळे एका व्यापाऱयाचे शेड कोसळले. निफाड, ओझर, पिंपळगाव, लासलगाव, नांदूरमध्यमेश्वर येथेही तुरळक पाऊस झाला. चांदवड तालुक्यातील दुगाव येथे सोमवारी रात्री पाऊस झाला. वडनेरभैरव येथे मंगळवारी दुपारी वादळी वाऱयासह पाऊस झाला. दिंडोरी, वणी येथेही मंगळवारी दुपारी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
वीज पडून एकाचा मृत्यू
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील देवी मंदिरात पूजा करणारे उदार वस्ती येथील संपत उदार (65) यांचा मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
कांदा भिजल्याने शेतकरी चिंतेत,लाखो रुपयांचे नुकसान
तालुक्यात अवधान आणि लळिंग शिवारातही मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱयासह पाऊस झाला. यामुळे शेतकऱयांनी जनावरांसाठी साठविलेल्या कोरडय़ा चाऱयाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या पावसात कोरडा चाराही ओला झाला. दुष्काळी परिस्थितीत साठविलेल्या चाऱयाचे नुकसान झाल्याने आता जनावरांसाठी प्रतिकूल परिस्थितीत चारा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. महसूल विभागाने पंचनामे करून तातडीने शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
























































