
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सोमवारी नवी दिल्ली येथे झाले. ‘नाळ’ चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यांना दिग्दर्शकीय पदार्पणाचा तर याच चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्याआधी श्रीनिवास सुरुवातीला व्यासपीठाच्या पाया पडला. नंतर तो उपराष्ट्रपतींच्या जवळ गेला आणि त्याने आशीर्वाद घेतला. श्रीनिवासच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. मराठी भाषेसाठी ‘भोंगा’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. आदिनाथ कोठारे याने ‘पाणी’साठी पुरस्कार स्वीकारला. ‘अंधाधून’साठी अभिनेता अंशुमन खुराणा, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईल’ चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशल यांना विभागून उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार देण्यात आला.

























































