नॅशनल जिओग्राफिक मॅगझीनने पुन्हा एकदा दिला कर्मचाऱ्यांना नारळ ..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विज्ञान आणि निसर्ग हे दोन विषय अत्यंत सखोलतेने हाताळणाऱ्या अत्यंत माहितीपूर्ण नॅशनल जिओग्राफिक मॅगझीनने पुन्हा एकदा उर्वरित कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गेल्या नऊ महिन्यांतील ही दुसरी कर्मचारी कपात आहे. आणि तसे पहिले तर २०१५ पासून चौथी.. वाॅशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार या मासिकात आता जास्तीजास्त मुक्त पत्रकारांचे साहित्य वापरले जाईल. १९ कर्मचाऱ्यांना येत्या बुधवारी नारळ दिला जाईल. एप्रिलमध्येच याविषयी कर्मचाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर मासिकाचे ऑडीओ डिपार्टमेंट अर्थात ध्वनीमुद्रण विभागही लवकरच बंद करण्यात येणार आहे. शिवाय असेही बोलले जाते आहे की पुढील वर्षी हे मासिक बंद पडण्याच्या वाटेवर आहे.

या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल जिओग्राफिक मॅगझीनच्या पत्रकारांनी आपल्या भावना ट्वीटरवर व्यक्त केल्या आहेत.