
नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेल्या आव्हान याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लॉण्डरिंग झाल्याचा दावा करत ईडीने सोनिया व राहुल गांधी यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला होता. एका व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे हे आरोपपत्र बनवण्यात आले असून त्याला एफआयआरचा आधार नसल्याचे कोर्टाने म्हटले होते. या निर्णयास ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.


























































