
गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईटक्लबच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकण्याआधीच नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंनी थायलंडमध्ये पलायन केले. नाईट क्लबच्या मालकांपैकी एक गौरव लुथरा याचा फुकेट विमानतळावरील फोटो समोर आला आहे. फुकेट येथील विमानतळावर इमिग्रेशन तपासणीदरम्यान गौरव लुथरा दिसला.
गोवा नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली तेव्हा लुथरा बंधू दिल्लीत होते. घटनेच्या काही तासांतच गौरव लुथरा (44) आणि त्याचा भाऊ सौरभ लुथरा (40) हे रविवारी सकाळी 5.30 वाजता इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेटला गेले. लुथरा बंधूंनी फुकेटमधील एका रिसॉर्टमध्ये चेक इन केले. मात्र अधिकारी तेथे पोहचण्याआधीच तेथून पलायन केले. अटकेपासून बचाव करण्यासाठी लुथरा बंधू फुकेटला पळाले.
नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीनंतर अनेक कॅफे आणि क्लबचे मालक असणाऱ्या लुथरा बंधूंवर एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांचा शोध घेत पोलीस पथक त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते, परंतु ते आधीच निघून गेले होते. लुथरा बंधूंवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे.



























































