राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, महाराष्ट्राला कठीण ड्रॉ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पाटणा

बिहार राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘66 व्या राष्ट्रीय महिला गट’ कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा ‘फ’ गटात समावेश आहे. या गटात महाराष्ट्रासह केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश या अन्य तीन संघाचा समावेश आहे. या स्पर्धेत 25 संघांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरला होता, पण प्रत्यक्षात 23 संघ स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाले. गतवर्षी उपांत्यपूर्व फेरीतच आपला पराभव झाल्यामुळे महाराष्ट्राची गटवार साखळीत एवढी पीछेहाट झाली.

विजयी सलामी
महाराष्ट्राने मध्य प्रदेशचा 44-20असा पराभव करीत 66व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. पूर्वार्धात एक लोण देत 22-12अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातदेखील तोच जोश कायम राखत आणखी दोन लोण देत सामना 24 गुणांनी आपल्या नावे केला.

स्पर्धेची गटवार विभागणी

1) अ गट – 1) हिमाचल प्रदेश, 2) बिहार, 3) उत्तराखंड.
2) ब गट – 1) हिंदुस्थानी रेल्वे, 2) ओडिशा, 3)जम्मू-कश्मीर, 4)विदर्भ.
3) क गट – 1) हरयाणा, 2) आंध्र प्रदेश, 3) दिल्ली, 4) मणिपूर.
4) ड गट – 1) पंजाब, 2) पश्चिम बंगाल युनिट, 3) झारखंड, 4) चंदिगड.
5) इ गट – 1) उत्तर प्रदेश, 2) छत्तीसगड, 3) पाँडेचरी, 4) आसाम.
6) फ गट – 1) केरळ, 2) महाराष्ट्र, 3) राजस्थान, 4) मध्य प्रदेश.