लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे. मतमोजणीपूर्वी आदल्या दिवशी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राजनंदगाव या मतदारसंघात ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे आपण निवडणूक आयोगाला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
चुनाव आयोग ने चुनाव में प्रयुक्त होने वाली मशीनों के नंबर दिए थे। इसमें बैलेट यूनिट, कंट्रोल यूनिट और वीवीपैट शामिल है।
मेरे चुनाव क्षेत्र राजनादगांव मतदान के बाद फ़ॉर्म 17सी में जो जानकारी दी गई है उसके अनुसार बहुत सी मशीनों के नंबर बदल गए हैं। जिन बूथों पर नंबर बदले हैं उससे… pic.twitter.com/HsKwS0xxCU
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) June 3, 2024
मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने मतदानासाठी वापरण्यात आलेल्या मशीनचे क्रमांक दिले होते. तसेच बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट आणि व्हीव्हीपॅट याची माहिती देण्यात आली होती. आपल्या मतदारसंघात राजनंदगावमधअये फॉर्म 17 नुसार जी माहिती देण्यात आली होती, त्याची पडताळणी केली असता अनेक मशीनचे क्रमांक बदलण्यात आले आहे, असे बघेल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.