
पश्चिम बंगालमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेलेले मालदा उत्तर मतदारसंघाचे खासदार खागेन मुर्मू आणि सिलिगुडीचे आमदार शंकर घोष यांच्यावर नागरकाटा येथे स्थानिक जमावाने हल्ला केला. पूरग्रस्त भागाची पाहणी करून परतत असताना जमावाने दगडफेक केली. त्यात ते जखमी झाले. या घटनेनंतर भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. हल्लेखोर तृणमूलचे कार्यकर्ते होते, असा आरोप भाजपचे अमित मालवीय यांनी केला आहे. जखमी आमदार व खासदारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.