दिल्लीतील प्रदूषण पाहून विदेशी पर्यटक हैराण

हिंदुस्थानातील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलेल्या एका विदेशी पर्यटकाने दिल्लीतील प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. शेन असे या विदेशी पर्यटकाचे नाव असून तो सध्या दिल्लीत आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण पाहून तो हैराण झाला. दिल्लीत समोर पाहणेही मुश्कील आहे. मी अनेक देशांचा दौरा केला आहे, परंतु इतकी खराब हवा कुठेच पाहिली नाही. दिल्लीत श्वास घेणेही अवघड आहे. डोळ्यात जळजळ आणि घशात खवखव होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येथे राहणे कठीण आहे, असेही तो म्हणाला.