
लग्न समारंभाहून परतत असताना बसची ट्रकला धडक बसल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सात जण जखमी झाले आहेत. धौलना-गुलावटी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात धौलना-गुलावटी रोडवर सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळा घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बसमधील सर्वजण गुलावटी येथे लग्नासाठी गेले होते. तेथून परतत असताना धौलना-गुलावटी रोडवर बसची ट्रकला धडक बसली. यात बसमधील सहा जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी काहींना रामा मेडिकल कॉलेजमध्ये, काहींना जीएस मेडिकल कॉलेजमध्ये, तर इतरांना धौलना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिक आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

























































