
भाविकांना घेऊन जाणाऱ्या एसयूव्हीची ट्रॅक्टर-ट्रेलरला धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे कल्याण भदरसा गावाजवळ प्रयागराज महामार्गावर ही घटना घडली. एसयूव्हीतीव सर्व भाविक मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येला चालले होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चार गंभीर जखमींना लखनऊ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मयत भाविकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

























































