अंघोळीला गेलेल्या तरुणाचा गिझरमधील गॅसमुळे गुदमरून मृत्यू

अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा गिझरमधील गॅसमुळे बाथरुममध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक असे मयत तरुणाचे नाव आहे. बराच वेळ अभिषेक बाथरुममधून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत ही घटना घडली. नेहमीप्रमाणे अभिषेक सकाळी अंघोळीसाठी गेला. मात्र बराच वेळ झाला तरी अभिषेक बाहेर आला नाही म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बाथरुममध्ये अभिषेक बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गिझरमधील कार्बनडायऑक्साईडमुळे गुदमरून तरुणाचा मृत्यू झाला.