केस चमकदार- सिल्की होण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीत केस कोरडे होतात. केसांना चमक येण्यासाठी किंवा ते सिल्की होण्यासाठी दूध आणि मध हा हेअरमास्क ट्राय करता येईल. मिश्रण केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत सगळ्या केसांना लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा.

आठवडय़ातून एकदा हा उपाय करा. केसांचा कोरडेपणा खूप वाढला तर दूध आणि केळीचा हेअरमास्क करू शकता. पिकलेले केळे मॅश करून त्यात दूध टाका. मिश्रण एकजीव करून केसांना लावा. बदल दिसून येईल.