भाजपची गुंडगिरी खपवून घेणार नाही – नवाब मलिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने काम करीत आहे. तुरुंगात टाकण्याच्या धमक्यांमधून काही साध्य होत नाही म्हणून विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करीत आहे.  ही गुंडगिरी खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  आज दिला.

विधानसभेत शिवीगाळ व गैरवर्तनावरून  नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.  महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही आणि विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचे नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी घटना

अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्या जवळ जाऊन भाजपच्या सगळ्या आमदारांनी त्यांना घेरले. धक्काबुक्की केली, आईबहिणीवरून शिवीगाळही केली. अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.