किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रातील ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील आयटम गर्ल असल्याचे त्यांनी म्हटले. मलिक यांच्या या विधानामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

‘एखादा सिनेमा चालावा यासाठी बॉलीवूडमध्ये आयटम गर्लची गरज असते तशा प्रसिद्धीसाठी किरीट सोमय्या हे राजकारणातील भाजपचे आयटम गर्ल बनले आहेत. ते भाजपच्या आयटम गर्लसारखे राजकारण करीत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे,’ अशा शब्दांत मलिक यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. मलिक यांनी त्यांच्यावर सोमय्या यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना हे विधान केले.

देशात परिवर्तन निश्चित

देशात परिवर्तन निश्चित होणार आहे. पाच राज्यांत भाजपच्या विरोधात वातावरण आहे. 2024च्या आधी या देशात एक पर्याय निर्माण करण्याचे काम सर्व लोक करतील. आम्ही काँग्रेसला घेऊन देशात पर्याय निर्माण करण्याच्या दिशेने काम करू, असेही त्यांनी सांगितले.