अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरी NCB ची धाड, ड्रायव्हरला घेतलं ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याच्या मुंबई येथील घरावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने अर्जुन रामपालच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतल्याचे समजते आहे. एनसीबी सध्या बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनची चौकशी करत आहे. अर्जुनचे नाव ही या प्रकरणात पुढे आलं आहे.

चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक

एनसीबीने एक दिवसाआधी बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक केली आहे. यासह एनसीबीने फिरोज नाडियाडवाला यांना समन्सही पाठविले आहे. या छाप्यापूर्वी एनसीबीच्या पथकाने फिरोजच्या घरातून ड्रग्ज जप्त केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजच्या घरी एनसीबीच्या सर्च ऑपरेशनमध्ये दहा ग्रॅम गांजा, तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईच्या पथकाने मुंबईतील 5 ठिकाणी छापा टाकला. यावेळी सुमारे 4 ते 5 ड्रग पुरवठा करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आले.