दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! जयंत पाटील यांची चंद्रकांत पाटील यांना शाब्दीक चिमटे

2286

दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शाब्दीक चिमटे काढले आहेत.

भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या विरोधात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन शुक्रवारी पुकारले आहे. हे आंदोलन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोणत्या घोषणा द्यायच्या, कपडे कोणते घालायचे याबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. या प्रसिद्धीपत्रकावरूनच जयंत पाटील यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना शाब्दीक चिमटे काढलेत. ‘चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या