मंगळवेढ्यात राष्ट्रवादीच्या भारत भालके यांची हॅट्ट्रिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भारत भालके हे 13 हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. भालके यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केली आहे. भाजपचे उमेदवार जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा त्यांनी पराभव केला. परिचारक यांना सर्व पक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला होता मात्र भालके यांनी सामान्य जनतेच्या जोरावर हा विजय खेचून आणला व तिसऱ्यांदा विजयी झाले. 


पवारांशी गद्दारी महागात पडली

शरद पवार यांनी सुधाकरपंत परिचारक यांना 5 वेळा आमदार केले 12 वर्षे एसटी महामंडळाचे अध्यक्ष केले. परिचारक पवार साहेबांना सोडून गेले याचा बदला पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने घेतला आहे. गेल्या निवडणुकीत परिचारक यांचा पुतण्या प्रशांत परिचारक यांचा 9 हजार मतांनी पराभव केला होता. आता काका सुधाकरपंतांचा 13 हजार मतांनी पराभव केला आहे.