Amol Mitkari News – आशिष शेलार हे वकील आहेत, अमोल मिटकरींनी करून दिली आठवण

बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे. त्याविरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. अशा मोर्च्यांना विरोध करणाऱ्यांची सालटी काढली पाहिजे असे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले होते. पण शेलार हे वकील आहेत अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, आमची विचासरणी ही धर्मनिरपेक्ष आहे, देशात राज्यात कुठेही हिंदू मुस्लिम वाद असता कामा नये. ज्यांनी राज्यात अशांतता निर्माण केली त्यांच्यावर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी मिटकरी यांनी केली. नाशिक, संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाने बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधात मोर्चा काढला होता. यो मोर्चाला हिंसक वळण लागले. अशा मोर्चांना विरोध करणाऱ्यांची सालटी काढली पाहिजे असे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले होते. त्यावर मिटकरी म्हणाले की शेलार हे वकील आहेत, त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. कुठेही चिथावणीखोर विधानं करतात आणि त्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होते. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते. असा प्रकार कुठल्याही सरकारच्या काळात होता कामा नये. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी ही धर्मनिरपेक्ष आहे. अशा वेळी सोलून काढण्याची भाषा करू नये. महायुतीमध्ये काम करणाऱ्यांनी सोलून काढू, ठोकून काढू अशी भाषा असंवैधानिक आहे, त्यांनी अशी विधानं करू नये असेही मिटकरी म्हणाले.