माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेसमधून अजित पवार गटात सामील झालेले बाबा सिद्दिकी यांची वांद्रे खेरवाडी सिग्नलजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर हल्लेखोरांनी त्यांच्यावर 2 ते 3 राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. हल्लेखोरांनी 2 ते 3 राऊंड गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या सिद्दिकी यांच्या पोटात लागल्या.
कोण आहेत बाबा सिद्दिकी?
लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले. बाबा सिद्दिकी वांद्रे पश्चिम येथून 1999, 2004 आणि 2009 मध्ये तीन वेळा आमदार राहिले असून काँग्रेसच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्र हाऊसिंग अॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या मुंबई विभागाचे अध्यक्षही होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दिकी यांनी भाजपा नेते आशीष शेलार यांचा पराभव केला होता. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हेदेखील राजकारणात असून वाद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत.