काँग्रेसमधून अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरमैल सिंह आणि धरमराज कश्यप या दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याची विनंती केली.
गोळ्या झाडून केलेल्या हत्येची घटना गंभीर आहे, असे सांगून पोलिसांनी आरोपींच्या सखोल तपासाची आवश्यकता असल्याचे सांगितले. सरकारी पक्षाची विनंती मान्य करीत न्यायालयाने दोन्ही आरोपींची 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, बिष्णोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली असून हत्येचे कारणही स्पष्ट केले आहे.
झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांच्या छातीत आणि पोटावर गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.