
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 608 पैकी महाविकास आघाडीला 277 जागा मिळाल्या आहेत. भाजप-शिंदे गटाला 210 जागा मिळाल्या आहेत, अशी अधिकृत माहिती आपल्याकडे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस 176, काँग्रेस 84, भाजप 168, शिंदे गट 42 अशी माहिती आहे. अभिनंदन करतो.
राज्यात अनेक प्रश्न आहेत पण काही प्रश्नांच्या संबंधात जनतेत अस्वस्थता आहे. याचं कारण राज्य सरकारनं काही निर्णय बदलले आहेत किंवा घेतले आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
कोरोना काळात काही पालक-मुलं मृत्यूमुखी पडले. त्यांना तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांनी अनुदान म्हणून 2500 रुपये जाहीर केलं होतं. मात्र तो निर्णय आताच्या सरकारनं रद्द केल्याचं कळतं आहे, असे शरद पवार म्हणाले.
अनुदान आणि मदतीच्या संदर्भात राज्य सरकानं लवकरात लवकर कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.
कथित पत्राचाळीच्या प्रकरणातील आरोपपत्रात शरद पवार यांचं नाव आलं असा प्रश्न विचारण्यात आल्यावर याची चौकशी करा अशी आमची भूमिका, असं शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.































































