Sunil Tatkare News : अजितदादांच्या संदर्भात पत्रकारानं विचारला प्रश्न; तटकरेंची चिडचिड

अजित दादा घर वापसी करणार का असा सवाल एका पत्रकाराने सुनील तटकरेंना विचारला. तेव्हा तटकरे चिडले. त्यांनी पत्रकाराला असे प्रश्न विचारू नका अशी विनंती केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची वाटचाल आणि सरकारी योजनांबद्दल माहिती दिली. तेव्हा एका प्रश्नामुळे तटकरे चिडले. एका पत्रकारने तटकरेंना विचारला की अजित पवार हे घरवापसी करतील का? यावर तटकरे गंभीर झाले. तटकरे म्हणाले की पत्रकार परिषदेचा एक शिष्टाचार असतो, आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करू नका. पत्रकार आणि राजकीय नेत्यांमध्ये एक सुसंवाद असायला हवा. असे प्रश्न विचारू नका असे तटकरे म्हणाले.