दिलीप सोपल आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. ते उद्या बुधवारी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोपल यांच्या राजीनाम्यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.

संभाजीनगर येथील चितेपिंपळगाव येथे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची खास भेट घेऊन दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. विधानसभा अध्यक्षांनीही तातडीने तो मंजूर केला. या वेळी शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते.