देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली; जयंत पाटील यांचा आरोप

368

नोटाबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली. नोटबंदीमुळे बेकारी वाढली. या सर्व परिस्थितीला भाजपा सरकार जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. पाटोदा शहरात शिवस्वराज्य यात्रेत पाटील यांनी आपल्या भाषणात सरकारवर कडाडून टीका केली. भाजपा सरकारने शहीद जवानांच्या नावाने मते मागितली. रेल्वेत 62 हजार जागांसाठी दोन कोटी अर्ज आले होते, यावरुन देशात किती बेकारी वाढली आहे, याची कल्पना येते असे ते म्हणाले.

भाजपा सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या करत आहेत. पवारसाहेबांनी ज्यांना राज्यमंत्रीपद दिले, महानंदाचे अध्यक्षपद, मुस्लिम समाजाला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले तरी लोक दुसरीकडे जातात, असे सांगत माजीमंत्री सुरेश धस यांचे नाव न खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली जाते, असा आरोपही त्यांनी केला. या वेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेश अध्यक्ष शेख महेबुब आदी उपस्थित होते. पावसाने दमदार हजेरी लावल्याने सभा अटोपती घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या