
देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, असे वक्तव्य करणाऱया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चांगलीच खिल्ली उडवली. आता चंद्रकांत पाटील यांच्यावरच करमणूक कर लावायला हवा, असे ट्विट त्यांनी केले.
चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेले एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे पैसे देत नाही, निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल, असे रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.





























































