जनता महाराष्ट्रद्रोह्यांचा एकाच टप्प्यात कार्यक्रम करणार, राष्ट्रवादीची टीका

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची आज घोषणा करण्यात आली महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिंधे सरकार व गद्दारांवर जोरदार टीका केली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ”निवडणुका एका टप्प्यात… आणि गद्दारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ पण एकाच टप्प्यात…” अशा एका ओळीत राष्ट्रवादीने गद्दारांना टोला लगावला आहे.

असा आहे निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

विधानसभेच्या 288 जागांसाठी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबरला जारी करण्यात येईल. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही 20 नोव्हेंबरला होणार आहे.