एनसीपीएमध्ये सुपरहीट कॉमेडी ‘चिंता छोड़ चिंतामणी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

यात्री प्रस्तुत सुपरहीट ‘चिंता छोड़ चिंतामणी’ या तुफान विनोदी हिंदी नाटकाचा प्रयोग एनसीपीएच्या एक्सप्रिमेंटल थिएटरमध्ये येत्या बुधवारी ११ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता रंगणार आहे. या नाटकाचे आतापर्यंत अडीचशेहून जास्त प्रयोग झाले आहेत. वसंत कानिटकर यांच्या मूळ नाटकावरून ओम कटारे यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या नाटकात ओम कटारे, मुकेश यादव, पुनीत मालू, सपना मल्होत्रा, मुकुंद भट्ट, अशोक शर्मा, पूजा मेहता, केया गुप्ता, अबिद खान, प्रतीक पेंढारकर आणि प्रशांत उपाध्याय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

षण्मुखानंदमध्ये रंगणार गंधार देशपांडेचे गायन

महाराष्ट्रातल्या भंडारा जिह्यात जन्मलेला व आता मुंबईत स्थायिक झालेल्या २२ वर्षीय गंधार देशपांडे याच्या मधुर आवाजातील गायन पुढच्या शुक्रवारी म्हणजे १३ जुलैला षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी साडेसात वाजता ऐकायला मिळेल. षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेतर्फे ‘सूरसागर’ ही हिंदुस्थानी शास्त्रीय मैफलींची मासिक मालिका सुरू आहे. त्यात तो आपली कला सादर करणार आहे. पंडित डॉ. राम देशपांडे आणि अर्चना देशपांडे या त्याच्या पालकांनीच गंधारला पहिलेवहिले शिष्यत्व दिले. हे दोघेही हिंदुस्थानी शास्त्रीय संगिताचे तज्ञ गायक आहेत. त्यानंतर गंधारने ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराण्याच्या गायकीचे धडे पं. राम देशपांडे यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेत गेली १३ वर्षे गिरवले. गंधारने आजवर अनेक संगीत स्पर्धांमध्ये मानांकने मिळकली असून गेल्या सहा वर्षांत सातत्याने आठ सुकर्णपदके पटकावली आहेत.