नेपाळमध्ये निदर्शनांमध्ये प्राण गमावलेल्या Gen-Z आंदोलकांना कार्की सरकार ‘शहीद’चा दर्जा देणार, 10 लाखांची मदतही जाहीर

नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी रविवारी घोषणा केली की Gen-Z निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना ‘शहीद; घोषित केले जाईल आणि त्यांच्या कुटुंबियांना १० लाख नेपाळी रुपये आर्थिक मदत दिली जाईल. गेल्या आठवड्यात झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये देशभरात झालेल्या हिंसाचार आणि विध्वंसात सहभागी असलेल्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच सचिव आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबोधित करताना पंतप्रधान कार्की म्हणाल्या, “सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेची हिंसाचार आणि तोडफोड करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल.” त्या म्हणाल्या की, ९ सप्टेंबरच्या निषेधादरम्यान जाळपोळ आणि तोडफोड करणे नियोजित होते, ते एक गुन्हेगारी कृत्य आहे आणि Gen-Z निदर्शक अशा कारवायांमध्ये सहभागी नव्हते. यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे.