नॅशनल टेस्टिंग एजन्सीची ‘परीक्षा’! डीयू, नेटसह सात परीक्षांच्या तारखा जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा एकत्रच घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची ‘परीक्षा’ सुरू झाली आहे. यूजीसी, नेटसह सात वेगवेगळ्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. सहा सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या काळात या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घेण्यात येणाऱया वेगवेगळ्या परीक्षांसाठी आता एकच नोडल एजन्सी बनवण्यात आली आहे. ही एजन्सी प्रवेश परीक्षा घेणार असून त्यानंतरच्या परीक्षा मात्र संबंधित विभाग घेतील. त्यानुसार आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी मार्फत घेण्यात येणाऱया नेट, दिल्ली विद्यापीठ, इग्नू ओपनमेट तसेच पीएचडी, आयसीएआर, एआयईईएच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱया सर्व परीक्षा सहा सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहेत. परीक्षांचे प्रवेशपत्र पंधरा दिवस अगोदर जारी करण्यात येतील. कोरोनामुळे अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या किंवा स्थगित करण्यात आल्या होत्या. यापैकी काही परीक्षांची तारीख एनटीएने जाहीर केली आहे.