
2020 मध्ये नेटफ्लिकचा Extraction हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ऍक्शन मूव्ही असून हिंदुस्थानी प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. चित्रपटाच्या शेवटी निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची अंधूक कल्पना दिली होती. नंतर काही दिवसांनी Extraction चा सिक्वेलची घोषणाही कीली होती. आता नेटफ्लिक्सने Extraction2 चा टीझर प्रदर्शित केला आहे.
Extraction च्या पहिल्या भागात टायलर ओवी महाजनला बांग्लादेशहून वाचवतो. परंतु त्याला गोळी लागते आणि तो नदीत पडतो. टायलर जिवंत असून आता तो कुठले मिशन हाती घेणार याची उत्सुकत प्रेक्षकांना लागणार आहे. तसेच Extraction च्या सिक्वेलमध्ये रणदीप हुडाच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू दाखवले जाणार आहेत असे सांगितले जात आहे. सध्या चित्रपटाचा टीझर रीलीज झाला असून अद्याप प्रदर्शनाची तारीख कळाली नाही. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ही तारीख कळणार आहे.

































































