‘सेक्रेड गेम्स-2’मधून गायतोंडे परत येतोय!

सामना ऑनलाईन, मुंबई

नवाजुद्दीन सिद्दिकीने ‘सिक्रेड गेम्स’मध्ये गाजवलेला गणेश गायतोंडे लवकरच परत येतोय. नेटफ्लिक्सवर तुफान गाजलेल्या या वेब सीरिजमध्ये प्रचंड खूनखराबा, शिवीगाळी आणि अश्लील दृश्यांचा भरणा होता. याच वेब मालिकेचा आता दुसरा भाग 15 ऑगस्टला दाखल होणार आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘सेक्रेड गेम्स-2’चा ट्रेलर मंगळवारी रिलीज करण्यात आला. हा दुसरा सीझन पहिल्या सीझनपेक्षा जास्त खतरनाक असल्याचे ट्रेलरवरूनच स्पष्ट होतेय. या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी आणि सैफअली खान यांनी धमाल केली आहे. कथानक पहिल्या कथेवरून पुढे नेण्यात आले असले तरी नव्या सीझनमध्ये आता कल्की कोचलिन आणि रणवीर शौरी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या