
नवं सरकार राज्यात आल्याबरोबर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत महाराष्ट्र विकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सोशल मीडियावरून त्यांनी केलेली टीका आता त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आघाडीने उत्तर देण्याआधीच नेटकाऱ्यांची त्यांना झोडपून काढलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या सोशल हँडलवरून नव्या सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ‘या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का?….महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!’, अशा काही पोस्ट टाकल्या. पण नेटकऱ्यांनी त्यांच्याच टीकेला लक्ष्य करत झोडपून काढलं.
विकास शिंदे नावाच्या एका युझरने ‘तुम्ही तुम्ही पाच वर्षे खुप अभ्यास केला’ असं सुनावलं आहे. तर जयचंद भोसले यांनी ‘स्वत: काय केल होत? अशी चोरून का शपथ घेतली होती?’ असे प्रतिप्रश्न केले. ‘त्यांनी लपून छपून काम नाही केलं. शपथविधीनंतर अवघ्या 2 तासात मंत्रिमंडळाची बैठक घेतली व कामाला सुरुवात केली. गेली पाच वर्षे अशाच प्रकारे खोटा प्रचार केल्यामुळे तुमची सत्ता गेली. आता आपण जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून काम कराल ही अपेक्षा’, अशी प्रतिक्रिया सुनील वाघ यांनी दिली आहे.































































