
कोकण रेल्वेने चाकरमान्यांसाठी खुशखबर दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी सुपरफास्ट नेत्रावती एक्स्प्रेसला खेड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक 16345 आणि 16346 नेत्रावती एक्सप्रेस या गाडीला खेड स्थानकावर शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर पासून अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
या गाडीच्या खेड स्थानकावर येण्याच्या व जाण्याच्या वेळा या खालील प्रमाणे असतील. मानसून वेळापत्रकानुसार लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणारी गाडी क्र.16345 3 वाजून 56 मिनिट यावेळी खेड स्थानकात येईल आणि 3 वाजून 58 मिनिटांनी सुटेल. तिरुवनंतपूरम येथून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी गाडी क्र.16346 ही खेड स्थानकात 12 वाजून 47 मिनिटांनी पोहचेल आणि 12 वाजून 49 मिनिटांनी सुटणार आहे. सर्वसाधारण वेळापत्रकानुसार लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणारी गाडी क्र.16345 3 वाजून 53 मिनिट यावेळी खेड स्थानकात येईल आणि 3 वाजून 55 मिनिट यावेळी सुटेल. तिरुवनंतपूरम येथून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी गाडी क्र.16346 ही खेड स्थानकात 11 वाजून 05 मिनिटांनी पोहचेल आणि 11 वाजून 7 मिनिटांनी सुटणार आहे. या गाडीमुळे चाकरमान्यांचा फायदा होणार आहे. नेत्रावती एक्सप्रेसला खेड येथे थांबा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात होती.


























































