नवीन कर विधेयक आज संसदेत मांडणार

नवे आयकर विधेयक गुरुवारी संसदेत मांडले जाणार आहे. विधेयकात 622 पानांमध्ये 536 कलमे, 23 प्रकरणे आणि 16 अनुसूची असल्याचे समजते. विधेयका कोणत्याही नवीन कर प्रणालीची तरतूद नाही. केवळ विद्यमान आयकर कायदा, 1961 ला सुलभ करण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. आधीच्या कायद्यात 298 कलमे आणि 14 अनुसूची आहेत.