
चित्रपट, वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणाऱ्या राजकीय गुंडगिरीला आळा घाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींची समाजातील प्रतिमा मलीन होत आहे, अशी मागणी परिणय फुके यांनी विधान परिषदेत केली होती. त्यावर समाजभावना दुखावणारा सीन असेल तर तक्रार करता येते, परंतु राजकारणातील लोकांची समज वाढावी याकरिता असे चित्रपट, वेब सीरिज बनवले जातात. महाराष्ट्रात राजकीय चित्रण करण्याची परंपरा आहे, मात्र आता अशा चित्रपट, वेब सीरिजला आळा घालण्यासाठी नवे धोरण तयार केले जाईल, अशी माहिती सांस्पृतिक मंत्री आशीष शेलार यांनी दिली.