महापारेषणची वीज गळती घटली! गळतीचे प्रमाण 2.81 टक्क्यांपर्यंत खाली आले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी महापारेषण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. त्यामुळे उच्च दाब वीज वाहिन्यांमधून होणाऱ्या वीज गळतीच्या प्रमाणत कमालीची घट झाली. मागील वर्षी उन्हाळ्यात सुमारे साडेतीन टक्क्यांच्या घरात असलेले वीज गळतीचे प्रमाण यंदा 2.81 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीबरोबरच वीज ग्राहकांवरील आर्थिक भार कमी होणार आहे.

वीज वाहून आणत असताना सुमारे अडीच-तीन टक्के विजेची गळती वीज नियामक आयोगाने मंजूर केलेली आहे. महापारेषण वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी ड्रोनचा वापर करत असल्याने तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्ती करणे शक्य होत आहे. तसेच वीज वाहिन्यांचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे विजेच्या गळतीचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी एप्रिल, मे महिन्यात वीज गळतीचे प्रमाण सुमारे 3.36 टक्के एवढे होते. मात्र यंदा एप्रिलमध्ये 2.97 टक्क्यांपर्यंत घट नोंदली आहे. तर मे महिन्यात 2.81 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या वीज कामगारांना विशेष रजा द्या! वीज कामगारांची मागणी

ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी धपडत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास किंवा कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यास संबंधिताला विलगिकरण कक्षात ठेवले जाते. मात्र या कालावधीत घेतलेली सुट्टी कर्मचाऱ्याच्या हक्काच्या सुट्टीतुन कापली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून काम करताना कोरोनाची लागण होत असल्याने प्रशासनाने कामगारांसाठी विशेष सुट्टी द्यावी अशी मागणी केली आहे.