ऑफिसमधील लंच ब्रेकलाच सुट्टी; नवा ट्रेंड सुरू

बदलत्या वर्क कल्चरमध्ये ऑफिस लंच ब्रेकचा ट्रेंड कमी होत आहे. पूर्वी कामाच्या दरम्यान लंच ब्रेक घेऊन आरामात जेवण करण्याची पद्धत होती. आता मात्र कामाच्या ठिकाणी काम करताना सॅण्डविच खाण्यापर्यंतच हे मर्यादित राहिले आहे. अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणानुसार, 62 टक्के कर्मचारी आता त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण करतात. संशोधकांचे मत आहे की, लंच ब्रेकच्या वेळी कामापासून दूर राहून जेवण केल्याने केवळ शरीराला आराम मिळत नाही, तर मेंदूही नव्या ऊर्जेसह सक्रिय होतो. अमेरिकेत 25-30 वर्षे काम केलेले कर्मचारी सांगतात की, एकेकाळी लंच टाइम म्हणजे कामापासून पूर्ण ब्रेक असायचा. कर्मचारी आणि वरिष्ठ एकत्र जेवण करायचे, नवीन विचारांवर चर्चा करायचे. लंच ब्रेक केवळ पोट भरण्याचा नव्हे, तर टीम बांधण्याची एक संधी असायची.