‘फिंगरप्रिंट लॉक’ने चॅटिंग होणार सेफ,व्हॉट्सऍपचे नवे फीचर

250

आपला मोबाईल फोन दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले चॅटिंग मॅसेज वाचले जाण्याची भीती असते. त्यामुळे चॅटिंग आणखी सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सऍपने  ‘फिंगरप्रिंट लॉक’ नावाचे नवे फीचर आणले आहे. व्हॉट्सऍप युजर्सच्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही आता व्हॉट्सऍप उघडता येणार नाही.

‘फिंगरप्रिंट लॉक’ची चाचणीही पूर्ण झाली असून लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्धदेखील झाल्याचे समजते.  क्हॉट्सऍपने आयओएस युजर्ससाठी हे फीचर तीन महिन्यांपूर्वीच उपलब्ध करून  दिले आहे. त्यामुळे आयफोनधारक आपले व्हॉट्सऍप चॅटिंग मॅसेज टच आयडी आणि फेस आयडीने सुरक्षित करू शकत आहेत. त्यानंतर  अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी आठ महिन्यांपासून या फीचरवर कंपनीकडून चाचणी सुरू होती.

कसे कराल सेटिंग

‘फिंगरप्रिंट लॉक’ फीचरसाठी सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंट पर्याय निकडा, त्यानंतर प्रायव्हसी पर्यायावर क्लिक केल्यावर फीचर अॅक्टिव्ह करता येईल. या फीचरमध्ये ऑटोमॅटिकली लॉकसाठी तीन पर्याय असणार आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे तातडीने लॉक करण्याचा, दुसरा पर्याय एक मिनिटानंतर आणि तिसरा पर्याय 30 मिनिटांनंतर लॉकचा असेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या