
न्यूयॉर्कच्या सार्वजनिक शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल. या निर्णयाला गर्व्हनर कॅथी हॅचुल यांनी ‘बेल टू बेल’ असे नाव दिलंय. याचा अर्थ शाळेच्या पहिल्या बेलपासून शेवटच्या बेलपर्यंत स्मार्टफोन वापराला बंदी. मात्र काही अपवादात्मक प्रकरणं म्हणजे वैद्यकीय गरज, किंवा विशेष मुले जी संवाद साधू शकत नाहीत, त्यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. त्याच वेळी पालकांना मुलांशी संपर्क साधता येईल, याची व्यवस्था करण्यास शाळांना सांगण्यात आलंय. कॅलिफोर्निया, फ्लोरिडा यांसारख्या राज्यांनी याआधीच शाळांमध्ये मोबाईलबंदीचा कडक निर्णय लागू केलेला आहे.
























































