नवपरिणीत जोडप्याने, मुख्यमंत्री निधीला दिला लग्नाचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

चिकलठाणा येथील कैलास बकाल पाटील यांच्या मुलाचा खोकडपुरा येथील संतोष वेताळ यांची मुलगी साक्षी हिच्या सोबत आज राहत्या घरी साधेपणाने संपन्न झाला.

दोन्ही कुटुंबातील फक्त पाच – पाच नातेवाईक ह्या विवाहास उपस्थित होते. लग्नात होणारा खर्च वाचल्यामुळे वधूपित्याने 51000 रुपये मुखमंत्री निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. खोकडपुराचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सतीश कटकटें व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे त्यांनी सदर निधीचा धनादेश सुपूर्द केला.