
कोरोना महामारीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता रेल्वेप्रवास सर्वसामान्यांसाठी बंद आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवदेन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले.
वृत्तपत्र विक्रेते मुंबई उपनगरांत ठाणे आणि त्यापलीकडे वास्तव्याला आहेत. वृत्तपत्र व्यवसायाला परवानगी असूनही रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वे प्रवासाची सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, विक्रेते शंकर रिंगे, राजेंद्र चव्हाण, अमोल खामकर उपस्थित होते.


























































